Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home देश

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

by News Desk
June 12, 2025
in देश
Ahmedabad
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे विमान लंडनच्या दिशेने निघाले होते आणि त्यात २४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोळ दिसत असून, या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले होते, परंतु काही वेळातच हा अपघात घडला.

एअर इंडियाचं हे विमान मेघानीनगर येथील रहिवासी भागात घडला असून, विमान कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान बोइंग ड्रीमलाइनर ७८७ असून, त्याची प्रवासी क्षमता आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

You might also like

No Content Available

घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि बचाव पथके तातडीने पोहोचली असून, बचावकार्य सुरू आहे. मेघानीनगर परिसर हा विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे, आणि विमान कोसळल्याने आसपासच्या रहिवासी भागातही नुकसान झाल्याची शक्यता आहे. स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोळ पसरले. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या दुर्घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरातील रस्ते बंद करून बचावकार्याला गती दिली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?

-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

-फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

Tags: AhmedabadAmit ShahGujratअमित शहाअहमदाबादगुजरात
Previous Post

विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?

Next Post

अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

News Desk

Related Posts

No Content Available
Next Post
Pune Corporation

अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

Recommended

पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ

पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ

May 19, 2026
प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…

प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…

November 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
Pune

भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved