Sunday, August 24, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय

by News Desk
July 2, 2025
in Pune, महाराष्ट्र, राजकारण
Raj Thackeray And Uddhav Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील आंदोलनामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये सूर जुळल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत युती केल्यास मनसेला किती फायदा होईल, याचा अंदाज घेण्यासाठी मनसे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही पक्ष आपापली राजकीय ओळख टिकवण्यासाठी झटत असताना, मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, अशी शक्यता आहे.

You might also like

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

मुंबई महापालिकेत युतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, परंतु पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये युतीचा किती लाभ होईल, याबाबत मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे मनसे युतीबाबत घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी सर्व पर्यायांचा अभ्यास करणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपैकी कोणासोबत युती फायदेशीर ठरेल, याचा विचार मनसे करणार आहे.

मुंबईत मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात दोन्ही पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हिंदी भाषिक मतांचा गठ्ठा त्यांच्याविरोधात जाऊ शकतो, अशी चिंता मनसेच्या काही नेत्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर, मनसे युतीच्या फायद्या-तोट्यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन निर्णय घेणार आहे. लवकरच कोणासोबत युती फायदेशीर ठरेल, याबाबत सर्वेक्षण केले जाणार असून, त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाईल. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारितच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….

-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना

-स्वारगेट प्रकरणी मोठी अपडेट, दत्ता गाडेला जामीन मिळाला?

-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?

-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?

Tags: Raj ThackerayshivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेठाकरे सेनामनसेराज ठाकरेशिवसेना
Previous Post

भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….

Next Post

पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…

News Desk

Related Posts

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
Pune

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

by News Desk
August 23, 2025
PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?
Pune

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

by News Desk
August 23, 2025
‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
Pune

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

by News Desk
August 18, 2025
कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण
Pune

कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

by News Desk
August 18, 2025
भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट
Pune

भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट

by News Desk
August 14, 2025
Next Post
पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…

पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत...

Recommended

bhimale program

पर्वतीत रंगणार खेळ पैठणीचा! अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा; श्रीनाथ भिमालेंचा अनोखा उपक्रम

August 24, 2024
‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी

‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी

April 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
Pune

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

August 23, 2025
PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?
Pune

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

August 23, 2025
Pune Corporation
Uncategorized

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

August 22, 2025
‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
Pune

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

August 18, 2025
कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण
Pune

कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

August 18, 2025
भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट
Pune

भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट

August 14, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved