पुणे : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवर घडत आहेत. अशातच शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 2 जुलै 2025 रात्री साडेसातच्या सुमारास घडली. अज्ञात आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश केला आणि पीडित तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला.
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची अकोल्याची असून ती आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. ती कल्याणी नगरमधील एका कंपनीत नोकरी करते. आरोपीने सोसायटीत प्रवेश करण्यासाठी कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. पीडितेच्या दारात पोहोचल्यावर त्याने बँकेचे कुरिअर असल्याचे सांगितले. तरुणीने कुरिअर आपले नसल्याचे सांगितले असता, आरोपीने सही करण्याचा आग्रह धरला. यामुळे तरुणीने सेफ्टी डोअर उघडले. त्याचवेळी आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांच्या 10 तपास पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, सुरक्षारक्षकांनी आरोपीची फारशी चौकशी केली नव्हती, ज्यामुळे त्याला सहज प्रवेश मिळाला.
या घटनेने उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे सोंग घेऊन गेट पार केल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…
-ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय
-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….
-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना