पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. याच शहरात एका भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य समोर आले आहे. प्रसाद तामदार ऊर्फ प्रसाद दादा (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात गंभीर आरोप असून, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तो भक्तांची फसवणूक करत होता. पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हा बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या माध्यमातून अश्लील कृत्ये करत होता. त्याच्या आश्रमातून पोलिसांना संशयास्पद गोळ्यांची पाकिटे आणि इतर साहित्य आढळले आहे.
या भोंदू बाबाने भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवली. याशिवाय, तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता. पोलिसांनी पाच भक्तांच्या चौकशीतून याची पुष्टी केली आहे. बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेणारा आणि संकट दूर करणारा म्हणून सादर करत असे. विरोध करणाऱ्या भक्तांना तो मृत्यूची भीती दाखवून मानसिक दबाव टाकत होता, ज्यामुळे अनेकजण त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत होते.
पोलिसांनी बाबाच्या आश्रमातून तीन मोबाइल, दोन आयपॅड, सोलोपोशे 0.5 मिलीग्रॅमच्या गोळ्यांचे पाकीट, प्रोव्हेनॉलच्या नऊ गोळ्या, सिमकार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त केले आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे साहित्य तपासासाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे. याशिवाय, बाबाकडे आढळलेल्या इतर वैद्यकीय औषधांचा वापर कशासाठी केला जात होता, याचाही तपास पोलिस करत आहेत.
पोलिस कोठडीत असताना बाबाविरोधात आणखी पुरावे समोर आले आहेत. त्याच्या आश्रमातील साहित्य आणि कृत्यांमुळे भक्तांवर झालेला मानसिक आणि शारीरिक अत्याचार उघड झाला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, बाबाच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही शोध घेत आहेत. या घटनेने पुण्यातील अंधश्रद्धेच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला असून, समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक! डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून बलात्कार केला मग सेल्फी काढला अन् म्हणाला, ‘मी…’
-पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…
-ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय
-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….
-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना