पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून जगभर ख्याती असणाऱ्या पुणे शहरामध्ये नेमकं कशाचं शिक्षण दिलं जातंय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना चंदननगर परिसरात उघडकीस आली आहे. येथील एका शाळेत आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने प्रेमसंबंधांबाबत अयोग्य आणि असंवेदनशील शिकवण दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या शिक्षकाने एका विद्यार्थिनीला वर्गात उभं करून, दोन बोटं एकत्र करत “तुझं कुठे लफडं आहे का?” असा प्रश्न विचारला. यामुळे विद्यार्थिनी घाबरली आणि तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने घडला प्रकार घरात सांगितला. यावरुन तिच्या कुटुंबियांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मंगेश असं या शिक्षकाचं नाव असून याने पीटीच्या (खेळाच्या) तासादरम्यान विद्यार्थ्यांना प्रेमसंबंध कसे प्रस्थापित करायचे आणि मुलींशी कसे वागायचे याबाबत चुकीचं मार्गदर्शन केल्याचा आरोप आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने मुलींना कसं आकर्षित करायचं? प्रेमात पडल्यावर हृदयाचे ठोके कसे वाढतात? अशा प्रकारच्या गोष्टी वर्गात शिकवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून, शिक्षकाविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, आता शहरात पालकांना आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना देखील भीती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
-प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?
-धक्कादायक! डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून बलात्कार केला मग सेल्फी काढला अन् म्हणाला, ‘मी…’
-पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…
-ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय
-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….