पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून, झाडाझडती मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे.
सागर मुंडे असे या तरुणाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, न्यायालयाने सागर मुंडेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित शाह गुरुवारी रात्री पुण्यात दाखल झाले. आज, शुक्रवारी (४ जुलै २०२५) सकाळी ११:३५ वाजता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीत काही बदल केले आहेत.
बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत मोर ओढा ते सर्किट हाउस आणि आयबी चौकादरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा केली जाईल. अमित शहा आज दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशीन चौक आणि कात्रज चौकादरम्यानच्या रस्त्यांवर सर्व मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे
-प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?
-धक्कादायक! डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून बलात्कार केला मग सेल्फी काढला अन् म्हणाला, ‘मी…’
-पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…
-ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय