पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान अमित शहा ४ विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेवर विरोधकांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गट यांच्याकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. एकनाथ शिंदेच्या घोषणेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली तर अजित पवार यांनी शिंदे काय म्हणाले ते माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले माहित नाही’, असं वक्तव्य करत अजित पवारांनी यावर बोलणं टाळल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय म्हणाले अजित पवार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी “जय गुजरात”चा नारा दिला. यावरुन त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
‘एकनाथ शिंद ज्यावेळी “जय गुजरात” म्हणाले तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. ते नेमकं काय म्हणाले माहित नाही. मी असेपर्यंत तरी तिथे असं काही झालं नव्हतं. आपला देश हा अनेक जाती आणि धर्मांमध्ये विखुरला गेला आहे. अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपली मातृभाषा मराठी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र
-विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
-पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
-अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका
-अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे