पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरुड पोलिसांनी तरुणींचा विनयभंग केल्याचा आरोप काही तरुणींना केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. आमदार रोहित पवारांनी देखील दखल घेतली होती. पोलिसांनी ठाण्यात आणून त्यांना बेदम मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. असं सांगत या तरुणींनी पोलिसांवर अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आता मोठी अपटेड समोर आली आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या ३ तरुणींसह एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. तरुणींनी कोथरूड पोलिसांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात रात्रभर ठिय्या आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी दिलेलं परिपत्रक आंदोलकांनी फाडून टाकलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
या आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत पोलिसांनी श्वेता पाटील आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन तरुणींपैकी दोन तरुणींचा समावेश आहे. दरम्यान, या आंदोलनात आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हेही उपस्थित होते, परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
-पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’
-भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
-स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा