Monday, July 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच

by News Desk
May 20, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Bhopal
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये महिलांचीच नाही तर पुरुषांची देखील मोठी फसवणूक करणाऱ्या टोळ्या देखील आहेत. अशातच आता भोपाळमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा पासवान असे तिचे नाव असून, तिने गेल्या सात महिन्यांत तब्बल २५ पुरुषांशी लग्न करून त्यांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सवाई माधोपूर पोलिसांनी सोमवारी, १९ मे २०२५ रोजी भोपाळ येथून तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला ‘लुटेरी दुल्हन’ असे संबोधले असून, ती एका मोठ्या विवाह रॅकेटचा भाग असल्याचे उघड झाले आहे. अनुराधा लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने काम करायची. ती स्वतःला गरीब आणि बेसहारा मुलगी असल्याचं सांगायची सादर करायची आणि लग्नासाठी उत्सुक असलेल्या पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायची. तिच्या साथीदारांद्वारे व्हाट्स अ‌ॅपवर संभाव्य वरांना तिचे फोटो आणि प्रोफाइल पाठवले जायचे.

You might also like

अघटीत घडलं! पुणे पोलीस दलात धक्कादायक घडलं

‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा

परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक

तेथील स्थानिक दलाल २ ते ५ लाख रुपये घेऊन लग्नाचा सौदा पक्का करायचे. कायदेशीर कागदपत्रांचा वापर करून ती लग्न करायची, काही दिवस सासरी राहायची आणि मग रात्रीच्या अंधारात सोने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळून जायची, असे मानटाउन पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी मीठालाल यांनी सांगितले.

या प्रकरणाचा खुलासा सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांनी ३ मे २०२५ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर झाला. विष्णूने दलाल पप्पू मीणा आणि सुनिता यादव यांना २ लाख रुपये देऊन अनुराधाशी लग्न केले होते. २० एप्रिल २०२५ रोजी स्थानिक कोर्टात त्यांचा विवाह झाला, पण २ मे रोजी अनुराधा मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाली. अनुराधा भोपाळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जाल रचून तिला बोगस ग्राहक बनून अटक केली. तिच्या साथीदारांचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

अनुराधा मूळची उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील आहे. ती पूर्वी तिथल्या एका रुग्णालयात काम करायची, पण कौटुंबिक कलहानंतर ती पतीपासून वेगळी झाली आणि भोपाळला आली. तिथे ती या फसवणूक रॅकेटमध्ये सामील झाली. सध्या तिच्याविरुद्ध सवाई माधोपूरच्या मानटाउन पोलीस ठाण्यात एकच गुन्हा दाखल आहे, पण तिने २५ पुरुषांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घटनेने विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, पोलिसांनी अशा रॅकेट्सविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी

-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?

-शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्याचा प्लॅन फिस्कटला; पोलिसांनी ‘त्या’ सराईताला ठोकल्या बेड्या

-भुजबळांना मंत्रिपद, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही थांबेना; नेमकं काय राजकारण?

-JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…

Tags: Anuradha PaaswanBhopalअनुराधा पासवानभोपाळ
Previous Post

काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी

Next Post

राष्ट्रवादीच्या नेत्याचा कळस; लहान सुनेला संपवलं, मोठीला कपडे फाटेपर्यंत मारलं, पुण्यात नेमकं काय घडलं?

News Desk

Related Posts

Pune Police
Pune

अघटीत घडलं! पुणे पोलीस दलात धक्कादायक घडलं

by News Desk
July 7, 2025
‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा
Pune

‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा

by News Desk
July 7, 2025
Pune Station
Pune

परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक

by News Desk
July 7, 2025
कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
Pune

कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली

by News Desk
July 7, 2025
हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
Business

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान

by News Desk
July 7, 2025
Next Post
Vaishanvi hagawane

राष्ट्रवादीच्या नेत्याचा कळस; लहान सुनेला संपवलं, मोठीला कपडे फाटेपर्यंत मारलं, पुण्यात नेमकं काय घडलं?

Recommended

पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र

पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र

August 10, 2024
पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?

पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?

May 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Pune Police
Pune

अघटीत घडलं! पुणे पोलीस दलात धक्कादायक घडलं

July 7, 2025
‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा
Pune

‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा

July 7, 2025
Pune Station
Pune

परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक

July 7, 2025
कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
Pune

कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली

July 7, 2025
हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
Business

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान

July 7, 2025
Chandrakant Patil
Pune

राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

July 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved