पुणे : अवघ्या महाराष्ट्रातून ठाकरे बंधू एकत्र यावी अशी भावना होती. राज्यात हिंदी भाषा सक्ती केली होती. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि या जीआरला महाराष्ट्रातून मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहता राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर काल ५ जुलै रोजी तब्बल 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईतील एनएससीआय डोममध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात त्यांनी एकत्रित उपस्थिती नोंदवली. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, याला प्रत्युत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागे राजकीय सोय असल्याचा आरोप केला आहे.
“दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे. हिंदुत्ववादी माणूस भावनिक आहे. मात्र ते राजकीय फायद्यासाठी एकत्र आले का कुटुंब म्हणून एकत्र आले, हे पहावं लागेल. तसेच इतके दिवस उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांना घ्यावं वाटलं नाही. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत 75 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेलेत. त्यामुळे आता राजकीय सोय म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतलं आहे. शिवाय राहिलेली मुंबई महापालिका ठेवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
“ठाकरे बंधूंची ही एकी किती काळ टिकेल? निवडणुकीपर्यंत त्यांचा हा मेळ टिकेल की त्यापूर्वीच ते वेगळे होतील, याबाबत शंका आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाचीही ताकद नाही. मुंबई कशाला कोण तोडतंय, आम्ही का मेलो आहोत का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आठवले नाहीत राज ठाकरेचा मुलगा विधानसभेत थांबला तेव्हा आठवले नाहीत. आता राजकीय सोय म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतलं आहे. मात्र ते किती दिवस एकत्र राहतील निवडणुकीपर्यंत राहतील का निवडणुकीच्या आधीच ते वेगळे होतील हे सांगता येत नाही”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला
-आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
-एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
-पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र
-विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा