पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या यामध्ये दरवर्षी प्रमाणे मुलीनी बाजी मारली असून दहावीच्या मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.१४% आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.३१ % आहे.
राज्यात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाने ९८.५७ टक्के निकालासह पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाने ९०.५६ टक्के निकालासह दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेसाठी राज्यभरातील १५,४९,६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,४५,८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १४,५८,१९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९४.६९ टक्के, तर कोल्हापूरचा ९५.५४ टक्के लागला आहे. मुंबई विभागाने ९३.६६ टक्के निकाल मिळवला, परंतु लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.७७ टक्के राहिला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदाही कोकण विभागाने ९८.४०% निकालासह आघाडी राखली आहे. एकूण निकालाचे प्रमाण ९३.४९ टक्के इतके लागले आहे.
राज्यातील विभागनिहाय निकाल
- कोकण – ९८.४०%
- कोल्हापूर – ९५.७६%
- पुणे – ९४.८९%
- मुंबई – ९३.६८%
- नाशिक – ९२.७४%
- लातूर – ९२.७७%
- अमरावती – ९२.५५%
- नागपूर – ९०.०८%
- छत्रपती संभाजीनगर – ८९.६२%
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल
-मान्सून निकोबार बेटावर दाखल झालाय; आपल्याकडे कधी पोहचणार?
-#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा
-‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?
-पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डु्डींचा इशारा