पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली. पाकिस्तानचा या हल्ल्यामध्ये हात असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात कारवाया करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांनी शनिवारी यावर आपले मत व्यक्त केले आहे.
‘काश्मीर खोऱ्यात वाढलेले पर्यटन आणि व्यापार शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे काश्मीर देशातल्या इतर राज्यांशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. काश्मीर सोडून देशातील अन्य ठिकाणी हल्ल्याआडून राजकारण केले जात आहे,’ असे मत हसीब दाब्रू यांनी व्यक्त केली.
‘जम्मू-काश्मीरची एकूण अर्थव्यवस्था २.६५ लाख कोटींची आहे. त्यात पर्यटनाचा वाटा केवळ ७ टक्के आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा नाही. देशाच्या कानाकोपऱ्यांत विक्री केली जाणारी सफरचंद, आक्रोड, चेरी, केशर, रेशीम, शाल अशी अनेक उत्पादने तेथे घेतली जातात. व्यापार हाच काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्या निमित्ताने काश्मीरचा देशातील इतर भागांशी संबंध येतो. आता पर्यटनामुळे स्थानिकांतही विश्वास निर्माण होत आहे. काश्मीरसह देशात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मात्र, हल्ल्यामुळे या सामाजिक सलोख्याला आणि एकोप्यालाच धक्का बसला आहे’, असेही द्राबू म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा
-पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू
-दत्ता गाडेच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती; तब्बल २२ हजार अश्लील व्हिडीओ….
-सिंहगड रोडवरील उड्डाणपुलामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
-लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख