Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
in महाराष्ट्र
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

ठाणे : राज्य सरकारच्या महसूल खात्याची फसवणूक करून बेकायदा गौण खनिज उपसणाऱ्यांना आता वठणीवर आणून, चांगलीच अद्दल घडविणयाचा पवित्रा कोकणच्या विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांनी शनिवारी घेतला. बेकायदा, परवानगीपेक्षा अधिक आणि दंड चुकवण्यासाठी बेसुमार खोदाई करणाऱ्यांवर नजर ठेवून, त्यांच्याकडून जागेवरच दंड वसूल करून अशा लोकांचा बंदोबस्त करा, अशा शब्दांत बेकायदा गौण खनिज खोदणारयांना धडा शिकवण्याची सूचनावजा आदेशच अग्रवाल यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिला. अशा प्रकारे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. परिणामी, सरकारला चुना लावणारयांसाठी कारवाईचा मोठा खड्डा खोदला जाणार आहे, हे निश्चित आहे. “अशा प्रकरणांमधील दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही आणि दंड आकारताना कोणतीही हायगय केली जाणार नाही, हेही अग्रवाल यांनी स्पष्ट केला.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी आणि परिणामकारकता याचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त अग्रवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णकांत पांचाळ यांच्यासह, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर आलेल्या रुबल अग्रवाल यांनी या बैठकीत संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या काही काळात कोणतीही परवानगी न घेता थेट उत्खनन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याशिवाय, परवान्यापेक्षा अधिक उत्खनन करून सरकारचा महसूल बुडवण्याचा आणि स्वतःचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे बेकायदा गौण खनिजाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला होता. यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मोहीम राबवूनही बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण राहत नव्हते. या पार्श्वभूमीवर,अग्रवाल यांनी आता विशेष मोहीम राबवून सरकारची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारचा महसूल चुकवून सर्रास बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण येण्याची आशा आहे.

विद्यार्थी-पालकांची अडवणूक खपवून घेणार नाही!

नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठी सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ केंद्रांना विभागीय आयुक्त रुबलअग्रवाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी दाखले घेण्यासाठी केंद्रावर आलेल्या नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला. “दाखले वेळेत मिळतात का?”, “जास्तीचे पैसे मागितले जातात का?” किंवा “कामासाठी अडवणूक केली जाते का?” असे थेट प्रश्न विचारून अग्रवाल यांनी या केंद्रांमधील कामकाजाची पारदर्शकता स्वतः तपासून पाहिली.
लोकांना सर्व दाखले वेळेत देऊन ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक ठेवावी, अशा सक्त सूचना त्यांनी केंद्रचालकांना व अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होत असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची दाखल्यांअभावी धावपळ होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आणि ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

असा बुडतो सरकारचा कोट्यवधींचा महसूल!

बेकायदा गौणखनिज उत्खनन आणि उपशामुळे सरकारी तिजोरीला कसा चुना लावला जातो, त्याचे धक्कादायक गणित खालीलप्रमाणे आहे:

१. विनापरवाना थेट चोरी सरकारी परवानगी न घेता उत्खनन केले जाते, ज्यामुळे सरकारला मिळणारी कोट्यवधी रुपयांची ‘रॉयल्टी’ (स्वामित्वधन) थेट बुडते.
⁠
२-परवानगीपेक्षा अधिक उपसा प्रशासनाकडून केवळ १०० ब्रासची परवानगी घ्यायची आणि प्रत्यक्षात पडद्यामागे ५०० ते १००० ब्रास उपसा करायचा. यामुळे केवळ कागदावर कर भरला जातो आणि उर्वरित खनिज बेकायदेशीरपणे विकून काळा पैसा कमावला जातो.

३-दंड चुकवेगिरी अवैध उत्खनन पकडले गेल्यास महसूल कायद्यानुसार मोठ्या दंडाची तरतूद आहे. मात्र, महसूल खात्याच्या सुस्त कारभारामुळे आणि प्रलंबित अपीलांचा गैरफायदा घेऊन दंडाची वसुली वर्षांनुवर्षे रखडवली जाते.
४-. बनावट वाहतूक परवाने एकाच रॉयल्टी पावतीवर (खनिजाची अनेक वेळा वाहतूक केली जाते, ज्यामुळे वाहतूक कराची उघड चोरी होते.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

-वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

-मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

-पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

Tags: Rubal AgrawalThane
Previous Post

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

Next Post

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026

June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

by News Desk
June 4, 2026
Next Post
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! 'अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने'साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

Please login to join discussion

Recommended

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

June 19, 2025
‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

Budget 2025: ‘मी अर्थसंकल्प सादर करणार’; राज्याच्या अर्थसंकल्पात कोण असणार केंद्रबिंदू? अजित पवार म्हणाले…

February 2, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved