Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

स्कूल झोन, झेब्रा क्रॉसिंग, भित्तीचित्रे आणि जनजागृती उपक्रमांद्वारे सुरक्षित शाळा परिसर उभारण्याचा प्रस्ताव

by News Desk
June 5, 2026
in Pune, पुणे शहर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : औंध-बोपोडी परिसरातील शाळांजवळील चौक अधिक सुरक्षित, सुबक आणि वाहतूक पूरक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडे निवेदन सादर केले आहे. प्रभाग क्रमांक ८ड अंतर्गत गणेशखिंड रोड परिसरातील विविध शाळांजवळील चौकांचा वाहतूकदृष्ट्या विकास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्य अभियंता, पथ विभाग यांना दिलेल्या निवेदनात निम्हण यांनी नमूद केले आहे की, केंद्रीय विद्यालय, डी.ए.व्ही पब्लिक स्कूल आणि स्पायसर स्कूल या नामांकित शैक्षणिक संस्था मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत कार्यरत आहेत. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांसह पालकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीवर ताण निर्माण होतो. परिणामी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अनेकदा धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित चौकांमध्ये ‘स्कूल झोन’ दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक चिन्हे आणि स्पष्ट रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शाळा परिसरात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणारी आणि त्यांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक व प्रबोधनात्मक भिंतीचित्रे (वॉल पेंटिंग) रंगविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी माहितीपर फलक व बॅनर्स लावण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, या भिंतीचित्रांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी तसेच मुलांवर त्याचा प्रभावी परिणाम होण्यासाठी हे काम फाईन आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्थांमार्फत करून घेण्यात यावे. याबाबत बोलताना नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. औंध–बोपोडी परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे संबंधित चौकांचे नियोजनबद्ध, सुरक्षित आणि वाहतूक पूरक स्वरूपात आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. पुणे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी.”

दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत विषयाचा योग्य पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आणि शाळा परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

-पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

-आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

-Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

-‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Previous Post

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

Next Post

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

Recommended

चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल

April 9, 2025
प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

May 4, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved