पुणे : गेल्या १७ वर्षांतील पहिल्यांदाच तो नियोजित वेळेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या मान्सून निकोबार बेटांवर दाखल झाला असून, दक्षिण अंदमान समुद्र आणि पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्येही त्याने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नैऋत्य मोसमी वारे माले, बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांमार्फत पुढे सरकतात. १५ किंवा १६ मेपर्यंत मान्सून आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्र, श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान बेटांवर पोहोचेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मान्सूनच्या या वेगवान प्रगतीमुळे देशभरात पावसाळ्याच्या आगमनाची उत्सुकता वाढली आहे.
पुढील दोन दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात १४ मेपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू येथेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांतील मान्सूनच्या आगमनाच्या तुलनेत यंदा तो पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचेल, जो साधारणपणे १ जूनला दाखल होतो. त्यामुळे यंदा लवकरच मान्सूनचा आनंद घेता येणार असून राज्यभर पावसाच्या सरी लवकरच बरसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा
-‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?
-पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डु्डींचा इशारा
-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी