पुणे : २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावले उचलली आहेत. बुधवारी, ७ मे रोजी भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात हवाई हल्ले करून दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त करत बदला घेण्यास सुरवात केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला असून, भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्यांचे सत्रही सुरू आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असून या वाढत्या तणावाचा परिणाम आता पुण्यासारख्या शहरांवरही दिसू लागला आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध परिस्थिती आणखी तीव्र होत असल्याने पुण्यातील विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील अनेक भागांतील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देत पुण्याहून १३ शहरांसाठीची विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हा तणाव निवळेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत विमान प्रवास टाळणं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. पुण्यातील नागरिकांनी घाबरून न जाता, परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा
-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल