Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

by News Desk
June 8, 2025
in Pune, पुणे शहर
८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. आंदेकर टोळी, मारणे टोळी तसेच घायवळ टोळी शहरात दहशत माजवत असते. शहरातील गणेश पेठेतील मच्छी मार्केटमध्ये दुकान चालवणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून गेल्या आठ वर्षांपासून दरमहा ५० हजार रुपये हप्ता वसूल केला जात होता. या काळात सुमारे ४८ लाख रुपये खंडणी गोळा केल्यानंतरही एकदा हप्ता न दिल्याने आंदेकर टोळीने व्यापाऱ्याच्या दुकानातील ९० हजार रुपयांचे साहित्य बाहेर फेकून दिले. इतकेच नव्हे, तर हे साहित्य जबरदस्तीने टेम्पोमध्ये भरून नेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीतील दोन जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी आहेत शिवम उदयकांत आंदेकर (वय ३०, रा. अशोक चौक, नाना पेठ) आणि आकाश परदेशी (वय ३०, रा. लोहियानगर). शिवम हा माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा मुलगा असून, तो आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी आणि धमकावणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये शिवमला तडीपार करण्यात आले होते. तडीपारीनंतर शहरात परतल्यानंतर त्याने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती, ज्यामुळे २०२१ मध्ये त्याच्यासह पाच जणांना अटक झाली होती.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

या प्रकरणी ४० वर्षीय व्यापाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम आंदेकर, आकाश परदेशी आणि इतर चार ते पाच गुंडांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, २०१६ पासून शिवमने व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केली. आकाश परदेशी गेल्या आठ वर्षांपासून हा हप्ता गोळा करत होता, ज्यामध्ये ऑनलाइन पद्धतीनेही पैसे वसूल केले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याने एकदा हप्ता देण्यास नकार दिल्याने मे महिन्यात आंदेकर टोळीने दुकानातील साहित्य बाहेर फेकले. या साहित्याची किंमत ९० हजार रुपये होती. टोळीने हे साहित्य टेम्पोमध्ये भरून नेले. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अटक केलेल्या दोघांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेमुळे गणेश पेठेतील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महत्वाच्या बातम्या

-पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

-चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

-पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

-…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

-बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

Tags: Akash PardeshiShivam Udaykant Andekarआकाश परदेशीशिवम उदयकांत आंदेकर
Previous Post

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर; प्लास्टिक संकटाबाबत केली चिंता व्यक्त

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर; प्लास्टिक संकटाबाबत केली चिंता व्यक्त

मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर; प्लास्टिक संकटाबाबत केली चिंता व्यक्त

Recommended

पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!

पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!

July 16, 2024
रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”

रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”

March 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved