पुणे : पुण्यातील कोंढव्यामध्ये एका इंजिनिअर तरुणीने तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दिल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावरुन पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा चुकीचा संदेस पसरवला जात आहे. असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचं सत्य २४ तासात समोर आणलं. त्यानंतर आता या घटनेसंदर्भातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमितेश कुमार यांनी रविवारी सिंहगड रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एका नवीन पोलीस चौकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले. खोटी तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने आपल्या प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय आहे. एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार केली होती की, एका अनोळखी डिलिव्हरी एजंटने तिच्या पुण्यातील 11 व्या मजल्यावरील घरात प्रवेश केला. त्याने काहीतरी केमिकल स्प्रे केले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच, त्या व्यक्तीने तिच्या मोबाईल फोनने सेल्फी काढला आणि ‘मी परत येईन’ असा धमकीचा संदेश टाईप केला, असेही तिने तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार पूर्णपणे खोटी असल्याचे पोलिसांनी 24 तासांत उघड केले. महिलेने पोलिसांपासून माहिती लपवून ठेवली, असेही कुमार यांनी सांगितले.
“या प्रकरणात महिलेची संमती होती, हे आम्ही सिद्ध केले आहे. महिलेने तिच्या एका मित्राला घरी बोलावले होते. सेल्फी तिच्या संमतीने काढण्यात आला, जो तिने नंतर एडिट केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, एक अनोळखी कुरिअर डिलिव्हरी करणारा माणूस घरात आला, जे खरे नाही. दुसरे म्हणजे, तिने सांगितले की, घरात जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला आणि तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी स्प्रे वापरण्यात आला, हे देखील खोटे ठरले. तपासामध्ये असे दिसून आले आहे की, दोघांमध्ये काही वाद झाले होते, त्यानंतर महिलेने खोटी तक्रार दाखल केली”, असे अमितेश कुमार म्हणाले आहेत.
दरम्यान, तरुणीने केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही. त्याचबरोबर, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच एडीट करून लिहिल्याची कबुली दिली आहे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. या घटनेचं सत्य समोर आल्यानंतर आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
-राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
-‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला
-आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
-एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’