पुणे : पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरले आहे. स्वरूप जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
स्वरूप जाधव हे पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये राहत होते. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी घडली, जिथे त्यांनी घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावला. स्वरूप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते आणि मूळचे कोल्हापूरचे रहिवासी होते.
या घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. मात्र स्वरूप जाधव यांचा मोबाइल पोलिसांना मिळाला आहे. हा मोबाईल लॉक असल्याने त्यातून कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. स्वरूप जाधव यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचे जीवन संपवल्याने सहकारी आणि वरिष्ठ अधिकारीही सुन्न झाले आहेत. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत असून, स्वरूप जाधव यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा
-परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक
-कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
-हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
-राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल