पुणे : आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. पूजेनंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी जमली होती, आणि हा प्रसंग पंढरपूरच्या वारकरी परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या शासकीय पूजेच्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आषाढी एकादशीचं औचित्य साधत राज्य सरकारवर टीका केली.
‘विठ्ठला, मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिवसरात्र शेतात राबून बळीराजा साऱ्या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आली आहे.
बच्चू कडू यांच्या या टीकेमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही काळात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलनं झाली आहेत. आषाढी एकादशीच्या पवित्र वातावरणात बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यामुळे सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा दबाव वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
-आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
-एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
-पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र
-विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
-पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर