पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या २५ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं कार्यरत होती. अखेर पोलिसांना आरोपीला पुण्यातूनच अटक करण्यात यश मिळाले आहे. आरोपी हा पीडित तरुणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही धक्कादायक घटना बुधवारी (२ जुलै २०२५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. आरोपीने कुरिअर देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीच्या घरात प्रवेश केला. त्याने तिच्या चेहऱ्यावर आधी स्प्रे मारला आणि अत्याचार केला. घटनेनंतर आरोपीने पीडितेचे फोटो मोबाइलमध्ये काढले आणि “मी परत येईन” असा धमकीवजा मेसेज लिहून तो पसार झाला. घाबरलेल्या तरुणीने तातडीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, ज्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
कोंढवा पोलिसांनी २८ ते ३० वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. पोलिसांनी दहा पथकं तयार करून आरोपीचा शोध घेतला. अखेर त्याला पुण्यातूनच अटक करण्यात आली. आरोपी हा पीडितेच्या ओळखीचा असल्याचे समोर आले असून हे दोघेहू जुने मित्र असल्याने आता या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.
पीडिता कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे आणि ती गेल्या दोन वर्षांपासून कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत आपल्या भावासोबत राहते. घटनेच्या वेळी तिचा भाऊ परगावी गेला होता, त्यामुळे ती घरी एकटी होती. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगून सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले आणि ही घटना घडवली. या प्रकरणाने पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असली, तरी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
-पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
-अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका
-अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे
-‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे