पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असून यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. या संभाव्य एकत्रिकरणाला काही नेते आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे, तर काही नेते याबाबत उत्साहात असून तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह धरत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेमध्ये आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे.
“अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत वारंवार होतात, पण त्या कधीही प्रत्यक्षात येत नाहीत. आताही तसेच आहे. अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेच त्यांचा पक्ष चालवतात. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यासारखे नेते बाजूला राहतात. हे तिघेच सगळे निर्णय घेतात. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून एकत्रीकरणाची चर्चा होते, पण त्याची अंमलबजावणी कधीच झालेली नाही”, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचा भविष्यात काय निर्णय असेल आणि त्याचा महाविकास आघाडीत काय परिणाम दिसून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
-SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण
-फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?
-गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?