पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात होणार असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुका घेण्याची तुमची इच्छाच नाही का? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, परंतु आता निवडणुका घेण्यास कोणताही अडथळा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन सुनावण्या सुरू राहतील, परंतु त्याचवेळी पुढील चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने
-पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…
-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ