पुणे : कधी कोणाला कशाचा राग येईल सांगता येत नाही. कोणाला गाडीला कट मारला म्हणून राग येतो तर कोणाला ओव्हरटेक केल्याचा राग येतो. कधी प्रेमात दगा मिळाल्याचा राग येतो तर कधी मित्र-मैत्रिणींमध्येही कधी शुल्लक कारणांवरुन वाद झाल्याचे पहायला मिळते. अशातच आता एका तरुणाने आपल्याला लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तिचा व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २४ वर्षीय तरुणीचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ तिच्या प्रियकराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात विनय शिरीष कुलकर्णी (वय २७, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०२५ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते, तर विनय हा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि सहमतीने त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या दरम्यान, विनयने तिच्या नकळत तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढले. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले आणि तरुणीने लग्नास नकार दिला. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र, तरुणीच्या एका मैत्रिणीला पॉर्न साइटवर तिचा व्हिडिओ दिसला आणि तिने याची माहिती तिला दिली आहे.
या घटनेनंतर तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनय कुलकर्णीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश
-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल
-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला