पुणे : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “घाणेरडं राजकारण” केल्याचा आरोप दुबेंनी ठाकरेंवर केला आहे. तसेच “तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर माहीम दर्ग्यावर जा आणि तिथल्या उर्दू भाषिकांवर कारवाई करून दाखवा”, असा इशारा देत “तुमच्या घरात सिंह असल्याचं तुम्ही म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा, आम्ही तुम्हाला आपटून मारू”, असं निशिकांत दुबे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महाराष्ट्रातील राजकीय नेते यावर आपापली मते व्यक्त करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दुबे यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, “दुबे हे आमच्या मित्रपक्षाचे खासदार असले, तरी त्यांनी मराठी भाषेबद्दल असं बोलू नये. तुम्ही तुमची भाषा झारखंडमध्ये वापरा, महाराष्ट्रात नाही. मराठी माणूस बाहेर का जाईल? मराठी माणूस जिथे काम करतो, ती त्याची कर्मभूमी आहे. अमराठी लोकांनी महाराष्ट्रात यावं, मराठी शिकावं आणि भाषेचा सन्मान करावा.” त्यांनी भाजपला आवाहन केलं की, अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी.
‘तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू, आपण झारखंडचे आहोत म्हणून बोलू, असं त्याला वाटलं असेल. मारायची गरज दुबे सारख्या लोकांना आहे. इथे येणार काम करणार आणि तंगड्या वर करणार. तुझ्या इथे येऊन तुला मराठी माणूस आपटू शकतो. दुबे कुत्र्यासारखा असेल, गुरफटून बोलत असेल. बाहेरच्या लोकांनी मराठी भाषेची अस्मिता आणि ही भाषा जपलीच पाहिजे. दुबे यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे, महाराष्ट्रात आले तर चपलेचा प्रसाद नक्की देईल’, असा इशाराही यावेळी रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक
-कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
-हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
-राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
-‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला