पुणे : पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी तिच्या सासरकडून दबाव टाकण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. तिच्या नणंदेसह फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर तिच्या नणंदेने सातत्याने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला. महिलेने धर्मांतरास स्पष्ट नकार दिल्याने तिला शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण सहन करावी लागली. याशिवाय, फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने तिला धमकी दिली की, “तू बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस आणि जर तू धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करू.” या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली.
ही घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित विवाहित महिलेवर तिच्या सासरकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता. तिने नकार दिल्याने तिच्यावर शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार घडले. या प्रकरणात ननंद आणि फ्रान्सिस यांनी महिलेला सतत त्रास दिल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकारानंतर महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली, ज्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे अधिक माहिती गोळा केली जात आहे. धर्मांतरासाठी दबाव टाकणे, शारीरिक मारहाण आणि धमकी देण्यासारखे गंभीर आरोप या प्रकरणी करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ननंद आणि फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पुण्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. धर्मांतरासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
-आता पिंपरी चिंचवडमध्ये पार्किंगची कटकट होणार कमी; ‘व्हॉट्सअॅप’वरुन करता येणार पार्किंग नोंदणी
-अजित पवारांच्या शिलेदाराला कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती करण्यासाठी भाजप वरिष्ठांची ताकद
-विठुरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे हजारो भाविकांची आरोग्यसेवा