Thursday, August 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

by News Desk
June 23, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Nitin Gadkari
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट या चौपदरी भुयारी मार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली असून, गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्रकल्प शहरातील वाहतूक सुलभ करण्यासोबतच पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गडकरी यांनी सोमवारी (२३ जून) पुणे दौऱ्यादरम्यान काकासाहेब गाडगीळ पुतळा आणि शनिवारवाडा येथे भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रासने यांनी निवेदन सादर करत प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची विनंती केली. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील प्रमुख मार्ग असून, येथे दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा भुयारी मार्ग भविष्यात ‘लिंक कॉरिडॉर’ म्हणूनही उपयुक्त ठरेल.

You might also like

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सुरुवात केली आहे. निधी उपलब्धतेसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सुमारे २.५ किमी लांबीचा हा चार पदरी भुयारी मार्ग वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबरोबरच पर्यावरण आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत.

आमदार हेमंत रासने म्हणाले, “शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही पुण्यातील प्रमुख समस्या आहे. यावर मात करण्यासाठी प्रस्तावित भुयारी मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. डीपीआर पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे, तर केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी नितीन गडकरी यांना विनंती केली आहे. हा भुयारी मार्ग माझ्या स्वप्नातील प्रकल्प असून, तो प्रत्यक्षात यावा यासाठी मी कटिबद्ध आहे.”

महत्वाच्या बातम्या

-पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

-हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

-लग्नात गाडी दिसली की लगेच विचारा, हुंड्यात मिळालेय का?, हुंडाबळी प्रकरणांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

-पुण्यात धक्कादायक प्रकार; मौत्रिणसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला खाकीचा धाक दाखवला अन्…

-पुण्यात व्यावसायिकाने संपवले जीवन, धक्कादायक कारण आले पुढे

Tags: hemant rasaneNitin Gadkariनितीन गडकरीपुणेशनिवारवाडाहेमंत रासने
Previous Post

पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

Next Post

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

News Desk

Related Posts

Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

by News Desk
August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

by News Desk
August 6, 2025
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

by News Desk
August 6, 2025
डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

by Team Local Pune
August 5, 2025
Next Post
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

Recommended

Lonawala

फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

June 11, 2025
Chandrashekahr Bawankule

‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा

January 10, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

August 6, 2025
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

August 6, 2025
डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved