पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणाला ७ दिवस उलटले अखेर आज पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मृत वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे यांची आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाने तिच्याशी केलेल्या घृणास्पद कृत्याचे पितळ उघडे पडले. त्यानंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. सत्ताधारी पक्षातील नेत्याकडून सूनांना मिळालेल्या वागणुकीवरुन विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली होती. अशातच आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती केली आहे.
वैष्णवी कास्पटे आत्महत्या प्रकरण अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. माझ्या वकील मित्र मैत्रिणींनो, या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका अशी मी एक वकील म्हणून आपल्याला विनंती करेल, अशी विनंती रोहिणी खडसे यांनी केली आहे.
स्व. वैष्णवी कास्पटे आत्महत्या प्रकरण अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. माझ्या वकील मित्र मैत्रिणींनो, या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका अशी मी एक वकील म्हणून आपल्याला विनंती करेल#वैष्णवीहगवणे #पुणे #राज्य_महिला_आयोग pic.twitter.com/NclKg3tJ9W
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 23, 2025
दरम्यान, आज राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. तसेच मृत वैष्णवीची सासू लता, पती, शशांक, आणि नणंद करिष्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ७ दिवसांनंतर राजेंद्र आणि सशील हगवणेंना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-हगवणे कुटुंबात ढवळाढवळ करणारा, प्रत्येक वादात नाव असणारा निलेश चव्हाण नेमका कोण?
-पुणे पुन्हा हादरलं; हगवणे प्रकरण ताजं असतानाच २२ वर्षीय तरुणीचा हुंडाबळी
-अन् वैष्णवीचं बाळ आजी-आजोबांकडं पोहचलं…अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी केली मोहीम फत्ते