पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता वाहनतळावर पावती फाडण्यासाठी थांबण्याची गरज भासणार नाही. महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत ‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ ही डिजिटल सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे नागरिकांना वाहनतळाची नोंदणी सुलभ आणि जलद पद्धतीने करता येणार आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार असून, पार्किंग प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३० लाखांच्या जवळपास आहे, तर वाहनांची संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांत साडेपाच लाख नवीन वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने सशुल्क पार्किंग धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. या धोरणाचा उद्देश वाहतूक नियंत्रण, इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे हा आहे. शहरातील दहा ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली असून, यामुळे वाहनचालकांना व्यवस्थित पार्किंगची सोय उपलब्ध झाली आहे.
सशुल्क पार्किंग सुविधा निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल, भक्ती-शक्ती, नाशिक फाटा, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल, चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपळेसौदागर येथील लिनिअर गार्डन शेजारील अर्बन स्ट्रीट, स्पॉट १८ सनशाइन व्हिलाज आणि गणेशयम सोसायटी येथील तीन ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी तासांनुसार शुल्क आकारले जाते. पूर्वी यासाठी दररोज पावती घ्यावी लागत होती, ज्यामुळे वेळ वाया जायचा. आता ‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ सेवेमुळे ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुलभ झाली आहे.
‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ सेवेसाठी महापालिकेने ८६२४९२५९३४ हा क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठविल्यावर नोंदणी प्रक्रियेची माहिती आणि पैसे भरण्यासाठी स्कॅनर प्राप्त होतो. नोंदणी ही वापरकर्त्याच्या नावाने आणि निश्चित वेळेसाठी केली जाते. जर वाहन ठरलेल्या वेळेत पार्क केले नाही, तर वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते आणि ती जागा दुसऱ्या वाहनासाठी खुली केली जाते. ही सुविधा शहरातील दहा ठिकाणी कार्यान्वित असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पार्किंग शुल्कामध्ये दुचाकींसाठी एका तासाला ५ रुपये, चारचाकींसाठी १० रुपये, रिक्षा आणि टेम्पोसाठी १५ रुपये, तर बससाठी ५० रुपये आकारले जातात. ज्या नागरिकांना दररोज वाहन पार्क करावे लागते, त्यांच्यासाठी मासिक पासची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. या पासधारकांना २० ते ३० टक्के सवलत मिळणार, असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. या डिजिटल सेवेमुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग सुविधा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.
कशी करणार नोंदणी?
महापालिकेने ८६२४९२५९३४ हा व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला आहे. त्यावर ‘हाय’ असा संदेश पाठविल्यानंतर पुढील नोंदणी करण्यासाठी कोणती प्रक्रिया करायची याची माहिती येते. तसेच पैसे भरण्यासाठी स्कॅनरही येतो. ही नोंदणी वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवली जाणार आहे. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते. ती जागा पुढील नागरिकांसाठी खुली केली जाते. शहरातील दहा ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.
किती आहे शुल्क?
दुचाकीसाठी एका तासाला पाच रुपये, चारचाकीला दहा रुपये, रिक्षा, टेम्पोला १५ रुपये, बससाठी एका तासाला ५० रुपये असे शुल्क आकारले जाते. एखाद्या नागरिकाला दिवसभरासाठी दुचाकी पार्क करावी लागते. त्यामुळे मासिक पास देण्याचे नियोजन सुरु आहे. पासधारकांना २० ते ३० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवारांच्या शिलेदाराला कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती करण्यासाठी भाजप वरिष्ठांची ताकद
-विठुरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे हजारो भाविकांची आरोग्यसेवा
-डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…