पुणे : पुणे शहरासह संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारी वैष्णवी हगवणेला सासरच्या हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याची अतिशय घृणास्पद घटना घडली. या प्रकरणी आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर आणि हगवणेंच्या थोरल्या सुनेने केलेल्या आरोपावरुन हगवणे कुटुंबातील सर्व व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सध्या वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा हे अटकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हगवणे कुटुंबाबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
सोशल मीडियावर नृत्यांगणा गौतमी पाटीलचा बैलासमोर केलेला डान्स व्हायरल झाला होता. हगवणे कुटुंबाने हा कार्यक्रम आयोजित करत गौतमीला बैलासमोर नाचण्याची सुपारी दिली होती. त्यातच आता हगवणेंचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा मुजोर माज स्पष्टपणे दिसत असून, त्यामधील वक्तव्यांनी नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये वैष्णवीचा दीर सुशील हगवणे घोड्यावर बसलेला दिसत आहे. तो म्हणतो, “माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, बाप माझाय, मी हवा करेन नाहीतर काय पण करेन… तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा!” असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामध्ये वर्चस्व गाजवण्याचा आणि धमकी देण्याचा पवित्रा स्पष्ट दिसून येतो. राजेंद्र हगवणेही या व्हिडीओत सुशीलसोबत दिसत आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी आधी तिच्या पतीसह सासू, नणंदेला अटक केली होती. तर, फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना देखील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. यानंतर तपासात आणखी ५ जणांची नावं पुढे आली, त्यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयीन प्रक्रियेत ते सध्या कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?
-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”
-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात सायबर क्राईम वाढला; आमदार हेमंत रासनेंकडून ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी