Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”

by News Desk
May 26, 2025
in Pune, पुणे शहर
बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडणारी आणखी एक घटना पुणे शहरातून समोर आली. राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाने त्यांच्या दोन्ही सुनांचा हुंड्यासाठी छळ केल्याचे समोर आले. हगवणेंनी मोठ्या सुनेला बेदम मारहाण केली. तर धाकट्या सुनेला मारहाण करत तिचा छळ केला त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी संतोष देशमुख यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली आहे.

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी करत त्यांच्या मुलगा धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आहे. पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुःखद घटनेवरुन देशमुखांनी कस्पटे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देण्याबाबत चर्चा केली आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

काय म्हणाले धनंजय देशमुख?

आमचं दु:ख आणि त्यांचं दु:ख काही वेगळं नाही. घरातील एखादा माणूस सोडून गेला तर तो भोग कोणाच्या नशिबी येऊ नये. कस्पटे कुटुंबियांना हे लेकरु सांभाळण्यासाठी, पुढे वाटचाल करण्यासाठी, तसेच या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वराने बळ दिलं पाहिजे, हीच आमच प्रार्थना. आपली माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. या नराधमांनी आपली माणसं ठेवली नाहीत. मात्र, खरी परिक्षा इथून पुढे आहे. न्यायालयाच्या पायरीवर जाताना आपण सगळं सिद्ध करणं आहे. त्यातूनच न्यायाची अपेक्षा करणं आहे. हे करुन न्याय मिळत नसेल तर अहिंसेच्या मार्गाने योग्य दिशा शोधणं गरजेचं आहे. घरी बसून आपल्याला मिळत नाही. रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतं. काय पाप केलं होतं माझ्या भावाने, वैष्णवी ताईने की, त्यांना कुटुंबांना सोडून जावं लागलं. न्यायासाठी लढावंच लागेल, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

भरपावसात बीडमधून पुण्यात आलेल्या देशमुख कुटुंबियांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करत त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार दिला. या वेळी धनंजय, वैभवी आणि राजश्री देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांचे मुलगा विराज देशमुखही उपस्थित होता. या भेटीतून एकमेकांच्या दुःखात साथ देण्याचा आणि अन्यायाविरुद्ध एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त झाला.

हत्वाच्या बातम्या

-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?

-पुण्यात सायबर क्राईम वाढला; आमदार हेमंत रासनेंकडून ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी

-नीलम गोऱ्हेंनी घेतली वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट; म्हणाल्या, ‘महिला आयोगाच्या सदस्यांची…’

-‘निवडणूक आल्या की कोरोना कुठून तरी बाहेर निघतोय’; वसंत मोरेंना नेमकं काय म्हणायचं?

-‘राज्याला पार्ट टाईम नाही फुल टाईम…’; चाकणकरांचा राजीनामा घ्या, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Tags: KaspatepuneRajendra HagwaneSantosh DeshukhVaishnavi Hagawaneकस्पटेधनंजय देशमुखपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेसंतोष देशमुख
Previous Post

हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?

Next Post

वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
Next Post
Vaishanvi Hagawane

वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

Recommended

पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

December 31, 2025
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…

July 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved