Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?

by News Desk
May 26, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वारजे माळवाडी येथे १९ मे २०२५ रोजी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने आता नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, वारजे पोलिसांच्या सखोल तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. हा गोळीबार स्वतः निलेश घारे यांनीच शस्त्र परवाना आणि पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी रचलेला बनाव होता, असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

घटना १९ मे रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. निलेश घारे हे आपल्या सहकाऱ्यांसह माळवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात आले होते. कार्यालयाबाहेर त्यांच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर घारे यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली, ज्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला. या तपासातून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या संशयितांनी धक्कादायक कबुली दिली की, हा गोळीबार निलेश घारे यांच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता. पोलिसांनी यानंतर सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ या तिघांना अटक केली. मात्र, या प्रकरणातील आणखी एक आरोपी संकेत मातले सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.

तपासातून असे समोर आले आहे की, निलेश घारे यांनी काही महिन्यांपूर्वी शस्त्र परवान्यासाठी वारजे पोलिस ठाण्यात अर्ज केला होता, परंतु तो नामंजूर झाला होता. त्यानंतर, आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवून शस्त्र परवाना आणि पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात घारे यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही या प्रकरणावर तीव्र चर्चा सुरू आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, निलेश घारे यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेने स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”

-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?

-पुण्यात सायबर क्राईम वाढला; आमदार हेमंत रासनेंकडून ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी

-नीलम गोऱ्हेंनी घेतली वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट; म्हणाल्या, ‘महिला आयोगाच्या सदस्यांची…’

Tags: Nilesh Gharepunepune policeshivsenaWarje Malwadiनिलेश घारेपुणेपुणे पोलीसवारजे माळवाडीशिवसेनाशिवसेना जिल्हाध्यक्ष
Previous Post

वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

Next Post

माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Rajendra Hagawane

माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे "बापाच्या जीवावर हवा..."

Recommended

अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली

अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली

May 17, 2024
‘तुम्ही माघार घेतली अन् माझी गोची झाली, लोक माझ्यासह तुमचाही उद्धार करताहेत’; शिवतारेंच्या कार्यकर्त्याचं पत्र व्हायरल

‘तुम्ही माघार घेतली अन् माझी गोची झाली, लोक माझ्यासह तुमचाही उद्धार करताहेत’; शिवतारेंच्या कार्यकर्त्याचं पत्र व्हायरल

April 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved