पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ५ जानेवारी २०२४ मध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणाने पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आता याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी एक प्लॅन आखला जात होता. हा प्लॅन आखणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एक पिस्तूलही जप्त केले आहे.
ओंकार सचिन मोरे असं या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात हा आरोपी फरार होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ओंकार मोरे याला रात्री अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याच्या घातपाताच्या योजनेला बळ मिळण्याची शक्यता होती.
दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी याच प्रकरणात शरद मालपोटे संदेश कडू यांना अटक केली आहे. आता ओंकार मोरेच्या अटकेमुळे या गुन्ह्याच्या तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अंदाज या घटनेवरून येतो. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आठ आरोपींना अटक केली असून आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
-भुजबळांना मंत्रिपद, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही थांबेना; नेमकं काय राजकारण?
-JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…
-मंत्रिपद मिळालं, नाराजी दूर; भुजबळांच्या मंत्रिमंडळात येण्यानं राजकीय गणिताला मिळणार बळ
-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, युवासेना जिल्हाप्रमुख कार्यलयात असतानाच गोळीबार
-प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास