पुणे : जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ दुर्धर आजारावरील उपचाराकरिता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १ मे रोजी उद्धाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून यासाठी मुंबईला मरावे लागणारे हेलपाटे आता थांबणार आहेत.
“राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल”, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू
-दत्ता गाडेच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती; तब्बल २२ हजार अश्लील व्हिडीओ….
-सिंहगड रोडवरील उड्डाणपुलामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
-लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख