Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?

by News Desk
March 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवार कुटुंबामध्ये मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका खासदार शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत लढवणार आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळात पवार कुटुंबामध्ये होणाऱ्या लढतीची चर्चा आहे. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे.

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या लढतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. आता अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे. श्रीनिवास पवार हे काटेवाडीमध्ये बोलत होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?”, असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

“दुसऱ्याकडून लाभ मिळणार म्हणून साथ सोडणं चुकीचं”

“यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही. आपल्याला दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार म्हणून साथ सोडणं चुकीचं आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे,” असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

“भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं”

“साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्याला चारवेळा उपमुख्यमंत्री केलं. २५ वर्षे मंत्री केलं अशा काकांना आपण हे विचारतोय? मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो. ही सगळी भाजपची चाल आहे. भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नितीने भाजप वागली आहे” असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली

-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट

-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी

-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान

-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?

Tags: ajit pawarBaramatibjpKatewadiLoksabha Electionsharad pawarShriniwas PawarSunetra PawarSupriya Suleअजित पवारकाटेवाडीबारामतीभाजपलोकसभा निवडणूकशरद पवारश्रीनिवास पवारसुनेत्रा पवारसुप्रिया सुळे
Previous Post

मुरलीधर मोहोळांची पक्षांतर्गत साखर पेरणी, भेटीगाठीतून घेतली प्रचारात आघाडी

Next Post

“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

"शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है"; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

Recommended

Shankar Jagtap And Ashwini Jagtap

Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?

October 15, 2024
Ajit Pawar

‘दादा हाच का तुमचा वादा?’ म्हणत सुस, बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा

January 5, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved