Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

by News Desk
June 4, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Nilesh CHavan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना पहायला मिळत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत असून सहआरोपी निलेश चव्हाण याला देखील अटक झाली आहे. निलेश चव्हाणच्या पिस्तूल प्रकरणाने नवीन वादाला तोंड फोडले आहे. निलेश चव्हाणने वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तूलाचा धाक दाखवल्याच्या आरोपांनंतर आता त्याच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना नाकारला होता, परंतु त्याने थेट मंत्रालयातून परवाना मिळवला. या प्रकरणात एका बड्या नेत्याचे नाव समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच काळात निलेश चव्हाण बलात्काराच्या गुन्ह्यात फरार होता, ही बाब या प्रकरणाला आणखी गंभीर बनवते.

निलेश चव्हाणने २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी तो फेटाळला. यानंतर चव्हाणने गृह विभागाकडे अपील केले. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडील सुनावणीत त्याला शस्त्र परवाना मंजूर झाला. मात्र, या सुनावणीवेळी चव्हाणवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देण्यात आली नव्हती, असे समोर आले आहे. या माहितीच्या अभावामुळे परवाना मंजूर झाल्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुणे पोलिसांनी मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात निलेश चव्हाणच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची महत्त्वाची माहिती दडवण्यात आली होती. या अहवालात २०१९ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दाखल झालेला हाणामारीचा अदखलपात्र गुन्हा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा आणि मे २०२२ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दाखल झालेला पत्नीच्या छळवणुकीचा गुन्हा यांचा उल्लेख नव्हता. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी त्याला परवाना नाकारला होता, परंतु मंत्रालयात ही माहिती पोहोचलीच नाही, ज्यामुळे चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला. या प्रकरणात तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

निलेश चव्हाणवर किती गुन्हे?

२००९ मध्ये निलेश चव्हाणर वारजे पोलिस ठाण्यात हाणामारीच्या अदखल पात्रवर गुन्हा दाखल झाला. २०२१ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणवर ड्रंक एन्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२२ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती की, स्पाय कॅमेरा लावून तिचे व्हिडिओ काढण्यात आले होते. त्या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व गुन्हे दाखल असताना देखील नोव्हेंबर २०२२ मधे तरीही निलेश चव्हाणला मंत्रालयातुन शस्त्रपरवाना देण्यात आला. मे २०२५ वैष्णवी हगवणे यांच्या बाळाला स्वतःकडे ठेवून त्याची हेळसांड केल्याप्रकरणी आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर निलेशने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती, त्यामुळे निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच मे २०२५ निलेश चव्हाणला बावधन पोलीसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सह आरोपी करुन गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या

-विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

-पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

-पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट

Tags: Nilesh ChavanSatej Patilनिलेश चव्हाणपुणे पोलीसपुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तासतेज पाटील
Previous Post

विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

Next Post

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Sharad Pawar And Ajit Pawar

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

Recommended

Health Update | तुम्हालाही जास्त घामाचा त्रास असेल तर पिण्याच्या पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ

Health Update | तुम्हालाही जास्त घामाचा त्रास असेल तर पिण्याच्या पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ

April 3, 2024
पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!

पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!

March 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved