पुणे : पुणे शहराची पाणी कपातीतून सुटका होणारच नसल्याचं दिसतंय. कारण आता पुणेकरांना येत्या सोमवारपासून पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ऐन उन्हाळ्यात शहरातील काही भागात ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरात पाण्याची मागणी २५ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळेच काही भागातील पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. यात कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या परिसराला महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो.
उपलब्ध पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होत असून सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. निर्णयाची अंमलबजावणी सोमवार ५ मे पासून करण्यात येणार असून रोटेशन पद्धतीने हे पाणी दिले जाणार असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी कपात केल्याने आता पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-दत्ता गाडेच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती; तब्बल २२ हजार अश्लील व्हिडीओ….
-सिंहगड रोडवरील उड्डाणपुलामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
-लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख
-पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल करणं तरुणाला पडलं महागात
-मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा