पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी, ७ मे रोजी देशभरातील २४४ संवेदनशील ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचे मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा समावेश असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांचाही यादीत समावेश आहे. याचा अर्थ, युद्धजन्य परिस्थितीत या दोन्ही शहरांना हल्ल्याचा धोका संभवतो, असे मानले जात आहे.
महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील ठिकाणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुंबई तर त्यानंतर उरण आणि तारापूर यांचा समावेश होतो. दुसऱ्या श्रेणीत ठाणेनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. मुंबईनंतर पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात मोठे महानगर आहे. शिक्षण, आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे पुणे लष्कराच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीत या शहराला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळावर सुखोई लढाऊ विमानांची तुकडी तैनात आहे, जिथे दररोज सराव सत्रे होतात. यामुळे हे ठिकाण लष्करासाठी अतिसंवेदनशील मानले जाते. याशिवाय, भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालयही पुण्यात आहे. खडकी येथील दारूगोळा कारखाना, पाषण येथील डीआरडीओ, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, आणि दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या संस्था पुण्यात आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयटी आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे पुण्याचे जागतिक महत्त्व वाढत आहे.. या सर्व बाबी लक्षात घेता, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मॉक ड्रिल्सद्वारे युद्धाजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. पाकिस्तानकडून या शहरांना झोका असल्याची शक्यता आहे, त्यामुळे अतिसंवेदनशील शहरांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…
-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा
-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल