पुणे : काँग्रेसच्या पुणे शहरातील माजी महिला शहराध्यक्ष आणि राज्य महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या लवकरच महायुतीतील एका पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. संगीता तिवारी यांनी ब्राह्मण असल्यामुळे पक्षात त्रास झाल्याचा आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खटला दाखल करण्याचा कट रचला गेल्याचा आरोप केला आहे.
‘मला पुणे शहराचे प्रभारी महिला शहराध्यक्ष पद देण्यात आले, परंतु त्यानंतर त्यांच्याकडून केबिन काढून घेण्यात आले. हि केबिन वेगळा आहे का सेलच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आली. ही केबिन काढून घेतल्यानंतर मी रागात येऊन केबिनचं ताबा घेण्याचा प्रयत्न करेन या दृष्टिकोनातून कटकारस्थान रचून असं केल्यास माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा देखील कट पुणे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून रचला गेल्या असल्याचं देखील संगीता तिवारी यांनी सांगितला आहे. ब्राह्मण असल्याने त्यांना पक्षात अपमानित केले गेले आणि काही नेत्यांनी “ब्राह्मण हे भाजपला मतदान करतात” अशी भावना व्यक्त केली. तसेच, काँग्रेसमध्ये ब्राह्मण नेत्यांना योग्य सन्मान मिळत नाही’ असा आरोप संगीता तिवारी यांनी सरकारनामाशी बोलताना केला आहे.
संगीता तिवारी यांनी पक्षातील अंतर्गत गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, नेता असो किंवा कार्यकर्ता खास करून महिला पदाधिकारी किंवा महिला कार्यकर्ता ह्यांची आपल्याच पक्षात घुसमट होत असेल, अंतर्गत जाणून-बुजून जर त्यांना त्रास देण्यात येत असेत तर वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. “एखाद्या पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरज नसेल, संघटनेची गरज नसेल, तर वेगळा विचार करावा लागतो. मग त्याला गद्दारी किंवा धोका म्हणाले तरी चालेल. सहनशक्तीची मर्यादा संपते, विशेषतः महिला खूप सहन करतात. अशा वेळी जिथे कामाला आणि किमतीला संधी आहे, तिथे जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो,” असेही त्या म्हणाल्या आहेत.
मी ब्राह्मण असल्याने ब्राह्मण हे भाजप विचारायचे असून ते आपल्याला मतदान करत नाहीत, अशी भावना काही नेत्यांनी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. काँग्रेसकडे काही ठराविक असलेल्या ब्राह्मण नेत्यांना देखील काँग्रेसकडून योग्य वर्तणूक देण्यात येत नसल्याचा आरोप देखील संगीता तिवारी यांनी केला आहे.
‘कुठेतरी सहनशक्ती संपते हो. खासकरून महिला खूप सहन करतात. शेवटी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता त्याची जर किंमतच पक्ष करत नसेल तर त्या व्यक्तीने स्वतः विचार करून एक वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. अश्या वेळी जिथे काम करायला संधी आहे तुमच्या कामाची किंमत आहे , असा पक्ष निवडून निर्णय घेणे गरजेचे असते. मग तो गद्दार, धोकेबाज, एहसान फरामोश म्हणले जाते’, असेही संगीता तिवारी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-एरव्ही पिक्चरमध्ये बोल्ड सीन आला की बंदी घालणाऱ्या चाकणकर…; शालिनी ठाकरें आक्रमक, नेमकं काय प्रकरण?
-पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई
-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित
-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त