पुणे : आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलने यंदाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन चांगले गुण मिळवले आहेत.
शिवराम नामदेव राठोड (९४.०५ टक्के), कोमल मारुती कुडके (९३.०८ टक्के), सादिया हबीब शेख (८८.०६ टक्के), जान्हवी अमोल हुंबरे (८८.०६ टक्के) आणि मयान अनिल कांबळे (८६ टक्के) या विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळवले आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशभरात नावलौकिक मिळवला आहे. आबा बागुल यांच्या पुढाकाराने या शाळेची स्थापना झाली असून, तेव्हापासून सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा कायम आहे. आबा बागुल यांनी सांगितले की, केवळ दहावी आणि बारावीच नव्हे, तर आयआयटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही या शाळेतील विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.
या यशाचे श्रेय शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना आबा बागुल यांनी दिले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शाळेचा भर आहे. या शाळेने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. या निकालामुळे शाळेची कीर्ती आणखी वाढली असून, भविष्यातही अशीच कामगिरी कायम राहील, असे म्हणत आबा बागुल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब
-पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी
-लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
-पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल