पुणे : राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज, २० मे २०२५ रोजी या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, धंगेकर यांची शिवसेनाच्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
रवींद्र धंगेकर यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर धंगेकर हे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले
मध्यंतरी त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना शिवसेनेच्या पुणे महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महानगर प्रमुख म्हणून त्यांच्यावर संपूर्ण पुणे शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक नेतृत्व घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल.
या नियुक्तीमुळे शिंदे गटाने पुणे शहरात आपली ताकद वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. धंगेकर यांचा राजकीय अनुभव आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल, अशी पक्षाला अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?
-शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्याचा प्लॅन फिस्कटला; पोलिसांनी ‘त्या’ सराईताला ठोकल्या बेड्या
-भुजबळांना मंत्रिपद, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही थांबेना; नेमकं काय राजकारण?
-JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…
-मंत्रिपद मिळालं, नाराजी दूर; भुजबळांच्या मंत्रिमंडळात येण्यानं राजकीय गणिताला मिळणार बळ