पुणे : सध्या राज्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली सुरु आहेत. अशातच आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. गेली दोन दशके हडपसर विधानसभा मतदारसंघ व परिसरात सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते रोहन गायकवाड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
रोहन गायकवाड यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ही एक मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रोहन गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
‘जनहितासाठी पक्षतर्फे त्यांना पूर्ण पाठबळ दिले जाईल’ हा विश्वास व्यक्त केला. हा पक्षप्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा मानला जात असून हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद यामुळे वाढल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?
-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?