Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?

by News Desk
May 30, 2025
in Pune, पुणे शहर
Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबाकडून झालेल्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आपले जीवन संपवले.  जीव देण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी हगवणे कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता सुनेला त्रास देणं, हुंड्यासाठी तिचा छळ करणं या कारणांमुळे अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचं आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्या पिस्तूल परवान्याची चौकशी केली असता, शशांक आणि सुशील यांनी खोटे पत्ते देऊन परवाने मिळवल्याचे उघड झाले. यामुळे शशांक याच्याविरोधात वारजे पोलिस ठाण्यात, तर सुशील याच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे कुटुंबाचे अनेक कांड समोर आले त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

हगवणे कुटुंब पुणे ग्रामीणमधील पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, परंतु तो फेटाळला गेला. त्यानंतर, शशांक आणि सुशील यांनी पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले. शशांकने वारजे, तर सुशीलने कोथरूड येथील खोटा पत्ता दाखवून पुणे शहर पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला आणि पिस्तूल खरेदी केली.

या खोट्या माहितीच्या आधारे शस्त्र परवाना मिळवल्याचे उघड झाल्याने हगवणे बंधूंवर नव्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या या गैरकृत्यामुळे हगवणे कुटुंबाच्या कायदेशीर अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

-वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

-हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

Tags: Rajendra HagawaneShahasnk HagawaneSushil HagawaneVaishanvi Hagawaneपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेशशांक हगवणेसुशील हगवणे
Previous Post

वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

Next Post

‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Rupali Chakankar

'तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची'; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

Recommended

“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही

March 26, 2024
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved