पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत मटण पार्टी करणे पुणे पोलिसांना चांगलंच अंगलट आलं आहे. गजा मारणे सध्या मोक्का अंतर्गत येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी अटक केल्यावर येरवडा कारागृहात स्थानिक गुंड, आरोपींसोबत राहणे त्याला कमीपणाचे वाटते. त्यामुळे त्याला येरवडा कारागृह नकोसे वाटत होते. ही गोष्ट पोलिस आयुक्तांना समजल्यावर त्याला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात आणण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे नेत असताना गजा मारणे आणि पोलिसांनी रस्त्यातील एका ढाब्यावर मटणाच्या जेवणावर ताव मारला. ही घटना ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचा बडगा उगारला. आरोपीला एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवताना काही कठोर प्रोटोकॉल आणि नियम पाळावे लागतात, परंतु पोलिसांनी या नियमांचा भंग करून बेजबाबदारपणा दाखवल्याची टीका होत आहे.
या मटण पार्टीदरम्यान गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या त्याच्या तीन साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या बेशिस्त वर्तनामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक नियमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!
-शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब
-पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी
-लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी