पुणे : पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत १८ मुलींची सुटका केली आहे. या छापेमारीत १० परदेशी नागरिकांसह दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. परिमंडळ ४ अंतर्गत बाणेर आणि विमानतळ परिसरातील मसाज सेंटरवर पोलिसांनी छापे टाकून हा गैरप्राचा पर्दाफाश केला आहे.
विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत १६ मुलींची सुटका करण्यात आली, यापैकी १० परदेशी आणि २ भारतीय मुली आहेत. या कारवाईत स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर आणि जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत, बाणेर येथील एका स्पा सेंटरवर छापा टाकून २ मुलींची सुटका करण्यात आली. येथील मालक आणि मॅनेजरवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय २८, रा. खराडी) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पीटा कायदा, पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत १५ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी या कारवाईद्वारे स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे शहरातील उच्चभ्रू भागांमध्ये अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. तपासादरम्यान आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव
-आता पिंपरी चिंचवडमध्ये पार्किंगची कटकट होणार कमी; ‘व्हॉट्सअॅप’वरुन करता येणार पार्किंग नोंदणी
-अजित पवारांच्या शिलेदाराला कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती करण्यासाठी भाजप वरिष्ठांची ताकद