पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या नावावरून पुण्यात राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर आता आनंद दवे यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हण महासंघानेही या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. महासंघाने रेल्वे स्थानक परिसरात ‘थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक’ असे फलक आणि बॅनर लावले आहेत.
या बॅनरद्वारे पेशवे नावाला होणाऱ्या विरोधाचे कारण स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगल्याचा आरोपही आनंद दवे यांनी केला आहे. ब्राम्हण महासंघाने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नावासाठी सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या मागणीनंतर पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापले आहे.
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, शहरात ‘पोस्टर वॉर’ सुरू झाल्याचे दिसून आले. मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून शहरात काही ठिकाणी खोचक बॅनर लावण्यात आले. यामध्ये ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा!’ असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने लावल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
-अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका
-अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे
-‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे
-प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?
-धक्कादायक! डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून बलात्कार केला मग सेल्फी काढला अन् म्हणाला, ‘मी…’