Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान

by News Desk
May 17, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अनेकदा प्राण्यांची तस्करी केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असतात. अशीच एक संतापजनक घटना आता पुन्हा समोर आली आहे. पुण्याहून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून ८ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला आहे.

उंटांची तस्करी करणाऱ्यांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अरुण कुमार चिनाप्पा (वय २८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि लखन मगन जाधव (वय ३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदीर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कृष्णा तुळशीराम सातपुते (वय २४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

फिर्यादी सातपुते हे वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना १३ मे रोजी रात्री साडे ८ वाजण्याच्या सुमारास मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दूरध्वनी करुन एका वाहनाबद्दल माहिती दिली आहे. रावेतवरुन एक ट्रक निघाला असून त्यामध्ये काही उंट निर्दयतेने कोंबण्यात आले आहेत. उंट कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. त्यानंतर सातपुते आणि त्यांचे मित्र मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते.

रात्री पावणे १०च्या सुमारास ट्रक चांदणी चौकाकडून येणाऱ्या ट्रकचा त्यांनी पाठलाग करत थांबवला. ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते. उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. ट्रकमध्ये चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी आरोपींकडे उंटांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रक, उंट आणि तस्करी करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या-

-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट

-‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं

-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ

-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण

-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान

Tags: CamalKarnatakapuneSmugglingकमलकर्नाटकतस्करीपुणे
Previous Post

पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट

Next Post

Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Recommended

Pune

चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?

April 26, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

हिंदी भाषा सक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस

June 21, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved