पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. बारावीचा निकाल उद्या (दि. ५) रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन आपल्या गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करू शकणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली आहे.
कोणत्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
महत्वाच्या बातम्या
-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
-‘काश्मीर सोडून देशात हल्ल्याआडून राजकारण केलं जातंय’; काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांचं वक्तव्य
-आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा
-पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू