पुणे : दौंड तालुक्यातील वाखारी येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत भोर-वेल्हा-मुळशी विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांच्यासह तिघांना अटक केली आहे. या घटनेत कैलास मांडेकर यांच्यावर यवत येथील कला केंद्रात गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला गोळीबार झाला की नाही, याबाबत संभ्रम होता. कला केंद्राच्या व्यवस्थापकांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले होते, तर समाजमाध्यमांवर याबाबत चर्चा पसरली होती. मात्र, पोलिसांनी कला केंद्राच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजता गोळीबार झाल्याचे कबूल केले. व्यवस्थापक अंधारे यांनी सांगितले की, भीतीमुळे त्यांनी यापूर्वी तक्रार दाखल केली नव्हती.
सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास झालेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहे.
पोलिसांनी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यापैकी तिघांना अटक केली. यात कैलास मांडेकर यांचा समावेश आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पत्नीला शेजारची सीट नाही दिली म्हणून भाजप पदाधिकाऱ्याने थेट केंद्रीय राज्यमंत्र्याकडे केली तक्रार
-आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार
-प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ