Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात रंगणार नव्या मैदानात जुन्या खेळाडूंचे सामने; कोण करणार कोणाला चितपट?

by News Desk
October 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Pune Assembly
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. भाजपने कसब्यातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांच्या नावांची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत खडकवासल्यातून सचिन दोडके, पिंपरीमधून सुलक्षणा शीलवंत, पर्वतीमधून अश्विनी कदम आणि जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांच्या नावांची घोषणा केली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरण बदललं असलं तरीही आताच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात जुनाच सामना रंगणार आहे. कसब्यात गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रंगलेला सामना आता पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत पहायला मिळणार आहे. पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या पॅटर्न चालला अन् भाजपच्या गडाला सुरुंग लागला. आता या कसबा निवडणुकीत धंगेकरांचा पॅटर्न पुन्हा चालणार की भाजपचं कमळ फुलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

खडकवासला मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकाच दिवशी उमेदवार जाहीर केला. भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सचिन दोडके यांना पुन्हा एकदा तापकीर यांच्या विरोधात खडवासल्याच्या मैदानात उतरवलं आहे.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत दोडकेंना विजयाची आशा असतानाच भाजपच्या तापकीरांचा निसटता विजय झाला. त्यानंतर आता भाजपने तापकीर यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. २०१९ साली तापकीरांना नाकीनऊ करुन सोडणाऱ्या दोडकेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता खडकवासल्यात तापकीर विरुद्ध दोडके या समान्यात काय रंगत पहायला मिळते हे औत्सुक्याचं आहे.

पर्वती मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली तर आज राष्ट्रवादी काँग्रेसने माधुरी मिसाळांना आव्हान देण्यासाठी अश्विनी कदम यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. २०१९च्या विधानसभेत अश्विनी कदम यांनी माधुरी मिसाळ यांना टक्कर दिली होती. कदम यांना ६० हजार मते मिळाली तर  मिसाळांनी ९७ हजार १२ मते मिळाली होती. कदमांचा पर्वतीमधून मोठा पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, यंदा त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत पुन्हा एकदा संधी दिली आहे.

दरम्यान, कसबा, खडकवासला आणि पर्वती मतदारसंघात ‘पट नवा पण खेळाडू जुनेच’ असे सामने रंगणार आहेत. त्यामुळे आता या तिन्ही मैदानात कोण कोणाला चितपट करतंय आणि या सामन्यांमध्ये काय वेगळी रंगत येणार हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी

-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले; खडकवासल्यातून सचिन दोडके तर पर्वतीतून कोण?

-महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?

-पुण्यात ठाकरेसेनेला दुय्यम स्थान, निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट; हडपसर अन् कसब्यात बसणार फटका

-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक

Tags: Ashwini KadamBhimram TapkirbjpKasba Hemant RasaneKhadakwaslaMadhuri MisalncpParvatiRavindra DhangekarSachin Dodkeअश्विनी कदमकसबा हेमंत रासनेखडकवासलापर्वतीभाजपभीमराम तापकीरमाधुरी मिसाळरवींद्र धंगेकरराष्ट्रवादी काँग्रेससचिन दोडके
Previous Post

रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी

Next Post

सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ 

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
brahmin community supports mahayuti

सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ 

Recommended

Pune

माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य

February 22, 2025
Ajit Pawar

राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

January 3, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved